Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरचा अभिमान,सांगलीत देशप्रमी माळींनी सजवली थार कार
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरचा अभिमान,सांगलीत देशप्रमी माळींनी सजवली थार कार
थार गाडी 'ऑपरेशन सिंदूर'ने सजवत भारतीय लष्कराचा केला सन्मान..ऑपरेशन सिंदूर'चे नेतृत्व करणाऱ्या 2 रणरागिणींचे फोटो ही लावले... कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची गावच्या उद्योजक विजय माळीनी देशप्रेम दाखवत 'ऑपरेशन सिंदूर'ला दिली मानवंदना.कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची गावच्या उद्योजक विजय माळीनी आपली थार गाडीवर 'ऑपरेशन सिंदूर' ने सजवलीय. तसेच 'ऑपरेशन सिंदूर'चे नेतृत्व करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि कर्नल व्योमिका सिंगचा फोटो ही थार गाडीवर लावून या दोन महिला अधिकाऱ्याचा गौरव केलाय. विजय माळीनी यातून 'ऑपरेशन सिंदूर'ला एक प्रकारची मानवंदनाच आणि भारतीय लष्कराचा गौरव केलाय. विजय माळी यांची ही 'ऑपरेशन सिंदूर'ने सजवलेली थार गाडी अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. थार गाडीच्या समोर काचेवर मोठ्या अक्षरात 'ऑपरेशन सिंदूर' लिहिले आहे. याशिवाय, गाडीच्या दारावर कर्नल सोफिया कुरेशी यांचा फोटो लावला आहे, तर दुसऱ्या दारावर कर्नल व्योमिका सिंग याचा फोटो लावला आहे. अशाप्रकारे विजय माळी यांनी संपूर्ण थार गाडी भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरच्या थीमवर सजवली आहे. ही गाडी पाहिल्यानंतर आपसुकच हृदयातून जय हिंद बाहेर पडते.



















