सांगलीत 1200 झाडांमधून 40 टन आंब्यांचं उद्दिष्ट, सेंद्रिय पद्धतीने आंब्याची लागवड
सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातील खरसुंडी गावच्या शेतकऱ्याने डोंगरात आंब्याची बाग फुलवलीय..गजानन पाटील असं या शेतकऱ्याचं नाव आहे. या शेतकऱ्यांने 6 एकरांत 1200 आंब्याच्या झाडाची लागवड केली. साधारण 1200 झाडांमध्ये 40 टन आंब्याचं उत्पन्न घेण्याचं गजानन पाटील यांचं उद्दिष्ट आहे. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा वापर करून ही आंबा बाग वाढवण्यात आली आहे.
2004 साली गजानन पाटील यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर माळरानावर आंब्याची बाग लावली. पूर्ण सेंद्रिय आणि नैसर्गिकरीत्या तयार केलेल्या बागेत यावर्षी आंबा चांगलाच लगडलाय.. आणि लवकरच बाजारपेठेत दाखल होण्याच्या मार्गावर आहे. लवकर आंबा तयार झाल्यामुळे उत्पन्नही चांगले मिळण्याची आशा पल्लवीत झालीय.




















