Aurangabad : विजय वडेट्टीवारांच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा गोंधळ,महाज्योतीला पैसे देण्याची मागणी
औरंगाबादमध्ये मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला.. यामुळे विजय वडेट्टीवार यांना काही वेळ भाषण थांबवावं लागलं.. ओबीसींवर अन्याय का? ओबीसीला न्याय द्या.. अशा घोषणा यावेळी विद्यार्थ्यांकडून देण्यात आल्यात.. तसंच सारथी शिक्षणासाठी पैसै देते मग महाज्योती का देत नाही? असा सवालही यावेळी विद्यार्थ्यांकडून विचारण्यात आला.. यानंतर पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमातून बाहेर काढले. दरम्यान, महाज्योती विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी महिन्याला तीस हजार रुपये मिळायला हवेत अशी मागणी आहे.. मात्र विद्यार्थ्यांनी ही मागणी योग्य ठिकाणी केली पाहीजे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे..






















