(Source: ECI/ABP News/ABP Majha)
OBC Reservation : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश स्थगित, निवडणुकाचं काय होणार? ABP Majha
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्यात. राज्य सरकारसह एकूण तीन हस्तक्षेप याचिकांवरील सुनावणी आज होणार आहे. ओबीसी आरक्षणाबाबत अन्य राज्यांचा नियम महाराष्ट्रालाही लागू करा, अन्यथा सर्वच निवडणुका पुढे ढकलून इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी मुदत द्या अशी मागणी या याचिकेत करण्यात आलीय. तसंच केंद्र सरकारकडे उपलब्ध असलेला डेटा राज्याला उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही याचिकेत करण्यात आलीय. निवडणूक आयोगाने राज्यातील १०५ नगरपंचायतीमधील ओबीसी प्रभागातील निवडणुकीला स्थगिती दिलीय. येत्या २१ डिसेंबरला यासाठी मतदान होणार आहे. फेब्रुवारीमध्ये २३ महापालिका, २५ जिल्हा परिषदा, २९९ पंचायत समित्या, २८५ नगर परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.