Dilip Khedkar : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
Dilip Khedkar : मी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे माझ्या मुलीची बदनामी झाल्याचा दावा दिलीप खेडकर यांनी केला.
Dilip Khedkar : प्रशासकीय सेवेमध्ये अत्यंत बोगसपणा करून आयएएस अधिकारीपर्यंत पोहोचून बडतर्फ झालेली पूजा खेडकरच्या वडिलांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर (Radhakrishna Vikhe Patil) यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी जाणूनबुजून त्रास दिल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मुलगी पूजावर झालेली कारवाई सुद्धा चुकीची असल्याची दिलीप खेडकर यांचं म्हणणं आहे. पूजा खेडकर विरोधात जी माहिती दिली गेली ती वस्तुस्थितीला धरून नाही. एक फ्रॉड मुलगी म्हणून सिलेक्शन झाल्याची माहिती दिली गेली ती चुकीच असल्याचेही ते म्हणाले. तिचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे दिलीप खेडकर म्हणाले.
विखे पाटील यांच्या मनामध्ये राग होता
दिलीप खेडकर यांनी सांगितले की माझ्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता म्हणून मला समोर येता आलं नाही. दरम्यान, विखे पाटील यांच्यावर आरोप करताना दिलीप खेडकर म्हणाले की माझ्या मुलीला जो त्रास झाला तो माझ्यामुळे झाला आहे. मी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे माझ्या मुलीची बदनामी झाल्याचा दावा दिलीप खेडकर यांनी केला. प्रस्थापितांना वाटत होतं की मी उभे राहू नये. या नेत्यांनी जाणून-बुजून त्रास दिल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, विखे पाटील यांच्या मनामध्ये राग होता. त्यांच्याकडे महसूल खाते होते. त्यांचा शासकीय अधिकाऱ्यांवर प्रभाव पडला आहे. म्हणून नैसर्गिक न्याय मला मिळाला पाहिजे होता तो मिळाला नसल्याचा दावा देखील त्यांनी केला.
परंतु तिने नाव बदलले नाही
त्यांनी सांगितले की, युपीएससीनं जे आरोप केले आहेत. त्यात युपीएससनं म्हटलं की पूजा खेडकर यांनी स्वतःच् नाव बदलले. परंतु तिने नाव बदलले नाही. ते म्हणाले की पूजा खेडकर वंजारी असून ओबीसी प्रमाणपत्र खोटं नाही. त्या वर्गवारीमध्ये जे अटेम्प्ट होते ते दिले आहेत. ते योग्य असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला. पर्सन विथ बेंचमार्कमध्ये 30-40 आजार आहेत. ॲाम्लोपिया हा आजार पूजाला असून पीएच वर्गवारीत हा आजार 2018 मध्ये आल्याचे दिलीप खेडकर म्हणाले. दोन्ही वर्गवारीचे ॲटम्प्ट वेगवेगळे असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या