एक्स्प्लोर
Kalyan : 'माझ्या डोक्यात रॉड घातलाय', NCP नेत्या Sandhya Sathe यांचा आरोप; पोलिसांसमोरच गुंडांचा हैदोस
कल्याणमधील म्होणे गावात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी संध्या साठे (Sandhya Sathe) यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 'माझ्या डोक्यात रॉड घातला आणि पोलिसांनी अजून माझी तक्रार नोंदवून घेतलेली नाही', असा गंभीर आरोप संध्या साठे यांनी केला आहे. फटाके खरेदीच्या किरकोळ वादातून शनिवारी मध्यरात्री साठ ते सत्तर जणांच्या जमावाने लहुजीनगरमधील घरांवर हल्ला केला. बांबू, रॉड आणि दगडांनी सुसज्ज असलेल्या या जमावाने घरांची तोडफोड केली आणि महिलांनाही मारहाण केली. यात संध्या साठे यांच्यासह नऊ ते दहा जण जखमी झाले. माहिती मिळूनही खडकपाडा पोलीस (Khadakpada Police) परिस्थिती नियंत्रणात आणू शकले नाहीत आणि त्यांच्यासमोरच हा हिंसाचार सुरू राहिल्याचा आरोप साठे यांनी केला आहे. पोलिसांनी आपल्या भावालाच लॉकअपमध्ये ठेवल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















