एक्स्प्लोर

Nawab Malik : माझ्यावर अॅट्रॉसिटीनुसार कारवाई करण्याची धमकी : नवाब मलिक

Nawab Malik Allegations : सामाजिक न्याय केंद्रीय राज्य मंत्री बनावट कागदपत्राच्या आधारावर नोकरी मिळवलेल्या व्यक्तीचं समर्थन करत आहेत. हे दुर्भाग्यपूर्ण आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अपाध्यक्ष अरुण हलदरजी भाजपचे नेते असतील. पण राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या जबाबदाऱ्या त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. कार्यपद्धती समजून घ्यावी. ज्या पदावर बसले आहेत, त्याचं आचरण कसं असायला हवं? या सर्व मर्यादा ओलांडत आहेत. समीर वानखेडे यांच्या घरी जाऊन ते क्लिनचीट कशी देऊ शकतात? संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती समीर वानखेडे यांना क्लिनचिट कशी देऊ शकते? याबाबत आम्ही राष्ट्रपती आणि सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहोत. या प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी करणार आहोत. बनावट कागदपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीबद्दल ममत्व का दाखवतं होते? त्यांनी मला अशीही धमकी दिलेय की, जास्त बोलाल तर अट्रासिटी कायद्याअंतर्गत कारवाई करुन तुरुंगात टाकू. जो व्यक्ती मागासवर्गीय नाही, त्याच्या आधारावर तुम्ही मला धमकावायचं काम करत आहात? आमचाही राजकीय अनुभव आहे. सर्वांनी मर्यादेत राहायला हवं, असे नवाब मलिक म्हणाले. 

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अपाध्यक्ष अरुण हलदर यांचं वर्तन संशयास्पद आहे. बनावट कागदपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याचा आरोप असणाऱ्या समीर वानखेडे यांच्या घरी ते कसे जाऊ शकतात. त्यांच्या घरी जाऊन कागदपत्रे पाहतात आणि क्लिनचीट देतात. संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती समीर वानखेडे यांना क्लीनचिट कशी देऊ शकते? असा प्रश्न नवाब मलिक यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांना विचारला. 
 
एनसीबी आधिकारी समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांच्याकडे केलेल्या तक्रारीचं नवाब मलिक यांनी यावेळी खंडन केलं. तीन वर्षांच्या मुलांचे फोटोही नवाब मलिकांनी उघड केल्याचा आरोप वानखेडे यांनी केला होता. तसेच वारंवार पत्रकार परिषद घेत आरोप करत असल्याचा कुटुंबाला त्रास होत असल्याचेही समीर वानखेडे म्हणाले होते. नवाब मलिक यांनी या सर्व आरोपाचं खंडन केलं आहे. मलिक म्हणाले की, 'समीर वानखेडे यांच्या दुसऱ्या बायकोचं मी नावही घेतलेलं नाही. ना त्यांच्या मुलांची नावं किंवा फोटो जाहीर केले आहेत. जर खोटं बोलायचं आहे तर नीट तरी बोला म्हणजे किमान लोकांना वाटेल की तुम्ही खोटं बोलत नाही.'

महाराष्ट्र व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget