Naresh Mhaske Lok Sabha Thane : बंडानंतर पहिली हकालपट्टी,आज म्हस्केंना थेट लोकसभा उमेदवारी
ठाणे : महायुतीत ठाण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे. काल झालेल्या बैठकीत अंतिम निर्णय झाल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे.
ठाणे लोकसभेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी काही प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत अंतीम निर्णय झाल्याची माहिती मिळाली आहे. या वेळी मुख्यमंत्र्याच्या घरी नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली . यानंतर उमेदवार निवडण्याचा सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. उमेदवार कोणी असो सर्व ताकद लावली जाणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सर्वांनी दिले , त्यानंतर नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.





















