Naresh Mhaske: उद्धव ठाकरे गटाला कोर्टाची चपराक, शिवसेना पक्ष कुणाची जहागीर नाही Shinde vs Thackeray
Maharashtra Politics Supreme Court: न्या. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना(Shivsena)कोणाची या मुद्यावर सुनावणी घेण्यावरील स्थगिती हटवावी यासाठी शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाने धाव घेतली आहे. तर, सुप्रीम कोर्टात निकाल दिल्याशिवाय, निवडणूक आयोगाने (Election Commission) कार्यवाही करू नये अशी मागणी शिवसेनेने केली होती. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील सुनावणी घटनापीठासमोर सुरू आहे. ही सुनावणी आता लंच ब्रेकनंतर होणार आहे. निवडणूक आयोगाला निवडणूक चिन्हाबाबत कार्यवाही करण्यास मंजुरी द्यायची का, याचा निर्णय आजच होण्याची शक्यता आहे. घटनापीठासमोर सुनावणी झाल्यानंतर शिंदे गटाचे वकील अॅड. कौल यांनी शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असून सुप्रीम कोर्टाने मनाई केली नसल्याचे सांगितले. तर, शिवसेनेचे वकील अॅड. कपिल सिब्बल यांनी संपूर्ण प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर निवडणूक आयोगाला सुनावणी घेण्याचे अधिकार द्यावे अशी मागणी केली.