(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Narendra Dabholkar Case Verdict : डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणाच्या तपासात काय काय समोर आलं?
Narendra Dabholkar Case Verdict : डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणाच्या तपासात काय काय समोर आलं?
Narendra Dabholkar Murder Case : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रमुख नरेंद्र दाभोळकर (Narendra Dabholkar) यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातील विशेष न्यायालयाकडून उद्या 10 मे रोजी अंतिम निकाल देण्यात येण्याची शक्यता आहे. दाभोळकरांच्या हत्येनंतर तब्बल 11 वर्षांनंतर दाभोलकर कुटुंबीयांना न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. सनातन संस्थेच्या पाच कार्यकर्त्यांवर डॉ. नरेंद्र दाभोळकर (Narendra Dabholkar) यांच्या हत्येचा आरोप आणि न्यायालयाकडून त्यांच्यावर आरोप निश्चितीही करण्यात आली आहे. पुण्यातील सीबीआयच्या (CBI) विशेष न्यायालयकडून शुक्रवारी (दि.10) मे रोजी निकालपत्राचे वाचन करण्यात येणार असल्याची माहित आहे.
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडे होता. तो नंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषन विभाग म्हणजेच सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. दरम्यान दाभोळकर हत्या प्रकरणात आत्तापर्यंत काय काय घडलं जाणून घेऊयात...