Narayan Rane : महायुतीचा 160 जागांवर विजय होईल, नारायण राणेंना विश्वास
Narayan Rane : महायुतीचा 160 जागांवर विजय होईल, नारायण राणेंना विश्वास
बांद्रा रेल्वे स्टेशन वर जी घटना घडली ती दुर्दैवी. त्याबाबत केंद्र सरकार उपाययोजना करतील. अशी घटना घडू नये यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार असून मोदी सरकार देशात आल्यावर देशात रेल्वे अपघात कमी झाले आहेत. मात्र संजय राऊत यांनी यावर घाणेरडे राजकारण करत आहेत, झालेली घटना दुर्दैवी आहे. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना तोंड काळं केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वतः च्या बुडाखाली आग किती लागलेली ती पहावी. संजय राऊत सकाळच्या घटनेवर राजकारण करत आहेत, अश्या लोकांना राजकारणातून हद्दपार केलं पाहिजे. ममता बॅनर्जी यांच्या काळात रेल्वे मंत्री असताना अपघात झाले नाही. रेल्वे मंत्री अनेक ठिकाणी जाग्यावर पाहणी करतात. उद्धव ठाकरे यांच्यासारखे घरात बसून ऑनलाईन राहिले नाही. रेल्वे विकसित होत असताना खोड्या करू नयेत. व्यक्तिगत दुष्मानी करण्याचा पुरस्कार कुणाला द्यायचा असल्यास उद्धव ठाकरे यांना द्यावा. नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवने, राणेंचे घर तोडायला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे अधिकाऱ्यांना फोन करायचे ही व्यक्तिगत दुष्मनी. उद्धव ठाकरे यांनी व्यक्तिगत दुष्मणी करण्याची phd केली. राज ठाकरे आणि भाजप च्या प्रमुख नेत्याशी चांगले संबंध असल्याने भाजप पाठिंबा देण्याच्या तयारीत असतील. जिल्हयात उद्या माजी खासदार निलेश राणे आणि नितेश राणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी खासदार नारायण राणे, मंत्री दीपक केसरकर, मंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, गोव्याचे आमदार विश्वजित राणे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.