(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nana Patole Full PC : शक्ती कायदा मंजूर झाला पाहिजे, नाना पटोलेंची मोठी मागणी
Nana Patole Full PC : शक्ती कायदा मंजूर झाला पाहिजे, नाना पटोलेंची मोठी मागणी
जिल्हा काँग्रेस कमिटीला विश्वासात नं घेता तालुका काँग्रेस कमिटीनं घेतला माजी जिल्हाध्यक्षांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम*
*माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर आहेत भंडारा विधानसभेसाठी इच्छुक*
Anchor : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडारा गृह जिल्ह्यातचं काँग्रेसमध्ये अंतर्गत दुफडी असल्याचा प्रकार भंडाऱ्यात आज समोर आलाय. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात नं घेता भंडारा तालुका काँग्रेस कमिटीनं घेतलेल्या कार्यक्रमातून हा प्रकार समोर आलाय. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर हे आगामी विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. मागील दोन वर्षांपासून त्यांनी विधानसभा क्षेत्र पिंजून काढलाय. शनिवारला प्रेमसागर गणवीर यांचा वाढदिवस होता. आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम भंडारा येथील एका सभागृहात भंडारा तालुका काँग्रेस अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे आणि भंडारा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत देशकर यांनी आयोजित केला. यात काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा शाल आणि रोपटं देत सत्कार करण्यात आला. मात्र, हा कार्यक्रम घेताना भंडारा तालुका अध्यक्ष आणि शहर अध्यक्षांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं नव्हे तर, महाविकास आघाडीसमोर या कार्यक्रमाच्या माध्यमातून भंडारा तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे शक्तीप्रदर्शन करीत काँग्रेस नेतृत्वालाच चॅलेंज दिलं आहे. कार्यक्रमस्थळी बॅनर आणि काही वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित करून नागरिकांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. या कार्यक्रमाला खासदार प्रशांत पडोळे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांनी पाठ दाखविली. यावरूनच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गृह जिल्ह्यात काँग्रेसमध्ये आता दोन गट तर पडले नाही ना, अशी उघड चर्चा होऊ लागली आहे.