एक्स्प्लोर

MVA VS Mahayuti : Ajit Pawar : भाजप आधी अजितदादांचा काटा काढणार, राऊतांच्या वक्तव्यावर महायुतीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया

MVA VS Mahayuti : Ajit Pawar : भाजप आधी अजितदादांचा काटा काढणार, राऊतांच्या वक्तव्यावर महायुतीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया 

ही बातमी पण वाचा

अजित पवारांना दूर लोटण्याचं काम केलं तर...; राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?

धुळे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) जागावाटपापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुतीतून (Mahayuti) बाहेर पडावे, यासाठी भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गटाकडून (Shiv Sena Shinde Group) प्रयत्न सुरु असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप अजित पवारांचा (Ajit Pawar) काटा काढणार असल्याचे त्यांनी म्हटले. आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे.  

आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत  जोरदार रस्सीखेच सुरु आहे. भाजप, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट आपाल्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील करत आहेत. त्यातच भाजप नेत्यांनी कुठल्याही परिस्थितीत 160 जागा लढवण्याचा निर्धार केल्याचे समजते. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटापैकी एकाला जागावाटपात नमते घ्यावे लागणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाने जागावाटपाच्या अंतिम टप्प्यात अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडल्यास आपल्याला अधिकाअधिक जागा लढवता येतील, अशी रणनीती आखल्याचे एका वृत्तपत्राने म्हटले आहे. 

अजित पवारांना दूर लोटण्याचं काम केलं तर...

यावरून संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे हे अजित पवारांना दूर लोटण्याचं काम करत करत असल्याचे वक्तव्य केले होते. याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, महायुतीला विधानसभेच्या निवडणुका एक संघ राहून लढवाव्या लागतील. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील दोन पक्ष फोडल्याचे केलेले काम हे त्यांना भरावं लागणार आहे. जर त्यांनी अजित पवारांना दूर लोटण्याचं काम केलं तर हे महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी केलेलं नाटक असेल, त्यापलीकडे त्याला काही महत्त्व नाही. ते कोणीही एकमेकांना सोडू शकत नाही. ते एकच आहेत आणि एकच राहतील, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत? 

अजित पवार यांना दूर लोटण्याचा कार्यक्रम आता भाजपने सुरु केला आहे. त्यामध्ये मिंधे गटाचे काही नेते सामील आहेत. अजित पवार यांना बाहेर काढलं तर जास्त जागा लढवता येतील, हे यामागील राजकारण आहे. अजित पवार काकांशी बेईमानी करुन आणि इतका मोठा धोका पत्कारुन भाजपसोबत आले. पण, आता त्यांची गरज संपली आहे. त्यामुळे अजित पवार यांना अडचणीत आणणारी वक्तव्यं आणि भूमिका भाजप व शिंदे गटाकडून घेतल्या जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

महाराष्ट्र व्हिडीओ

Top 70 News : सकाळी 7  च्या 70 महत्वाच्या बातम्यांचा आढावा : 05 DEC 2024 : ABP Majha
Top 70 News : सकाळी 7 च्या 70 महत्वाच्या बातम्यांचा आढावा : 05 DEC 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Top 70 News : सकाळी 7  च्या 70 महत्वाच्या बातम्यांचा आढावा : 05 DEC 2024 : ABP MajhaSpecial Report Eknath Shinde : दिल्लीतला फोटो  ते राजभवन, चर्चा एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याची ABP MajhaZero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Embed widget