Mumbaicha Raja Visarjan 2024 : मुंबईच्या राजाला विसर्जन मिरवणुकीसाठी ढोल पथकांची सलामी
Mumbaicha Raja Visarjan 2024 : मुंबईच्या राजाला विसर्जन मिरवणुकीसाठी ढोल पथकांची सलामी
मुंबईचा राजा विसर्जन मिरवणूकी करता दोन वाद्य पथके मंडळाकडून ठरवण्यात आले आहेत.
विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाल्यापासून गणेश गल्ली ते सेंटर पॉईंट नाका येथे पुणेरी ढोल वाजवण्यात येईल. त्यानंतर बँजो पथकाच्या वाजकांची सलामी सुरू होईल.
सदर वाद्य पथक मुख्य प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर तेथे मंडळाच्या वतीने पाच मिनिटांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम सादर केला जाईल. त्याकरता वाजप काही वेळा करता बंद केले जाईल. व त्यानंतर पुन्हा मिरवणुकीला प्रारंभ केला जाईल.
यंदाच्या वर्षापासून मुंबईचा राजा पूजा मूर्तीच्या ट्रकमध्ये पदाधिकारी व नियोजित सदस्यांव्यतिरिक्त इतर कोणीही प्रवेश करू नये.
लहान मुले, वयोवृद्ध कार्यकर्ते, महिला यांच्या करिता पूजा मूर्तीच्या पुढे अतिरिक्त ट्रकची व्यवस्था करण्यात आलेली आहे.