Mumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा : मुंबई सुपरफास्ट : ABP Majha : 6 PM
Mumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा : मुंबई सुपरफास्ट : ABP Majha : 6 PM
मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्वेतील सखल भागात पाणी साचलं, खेडेगोळवली परिसरात रस्ते जलमय, शेकडो घरांमध्येही पाणी शिरलं.
कल्याणमध्ये झालेल्या पावसानंतर शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी केली पाहणी, मात्र केडीएमसी अधिकारी फिरकले नसल्याची नागरिकांची माहिती.
पनवेलमधल्या आदई गावाजवळच्या डोंगरात धबधब्यावर गेलेल्या ९ जणांना पोलिसांनी रेस्क्यू केलं, यामध्ये ८ मुली आणि एका मुलाचा समावेश, उतरत असताना सर्व मुले डोंगराच्या मध्येच अडकली.
उल्हासनगरमध्ये रस्यावरच्या खड्ड्यात अडकली अग्निशमन दलाची गाडी, संभाजी चौक परिसरातली घटना, वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे गाडील उलटण्यापासून वाचली.
पालघर जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस, आज आणि उद्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
पालघरमधील पंचाळी रमाईनगरमध्ये साचलं पाणी, नियोजनाअभावी पाणी साचल्याचा नागरिकांचा आरोप,
मुसळधार पावसामुळे पालघरमधील अनेक भागातील ओढ्यांना पूर, ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्यानं केळवे रोड स्थानकाकडे जाणारा रस्ता बंद