Mumbai Police Special Report :मुंबई पोलीस,क्राऊड मॅनेजमेंटचे हिरो; त्यांच्या 'कर्तव्यदक्षते'ला सलाम
Mumbai Police Special Report :मुंबई पोलीस,क्राऊड मॅनेजमेंटचे हिरो; त्यांच्या 'कर्तव्यदक्षते'ला सलाम
T20 विश्वचषक जिंकूण भारतीय संघाचे गुरूवारी मुंबईत जल्लोषात स्वागत झालं, मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम या मार्गावर टीम इंडियाची विजयी मिरवणूक पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. अपेक्षा पेक्षा जास्त नागरिक मिरवणूकीत सहभागी झाल्याने नागरिकांना आवरणंही पोलिसांसाठी जिकरीचं होतं. उत्तरप्रदेशच्या हातरसमध्ये घडलेल्या घटनेची पुर्नरावृत्ती होते की काय अशी परिस्थिती असताना. मुंबई पोलिसांनी 'सदरक्षणाय खलनिग्रणाय' या ब्रिद वाक्याप्रमाणे आपली भूमिका चोख बजावली. कालचा विजयोत्सव मुंबई पोलिसांनी कुठलेही गालबोट न लागता यशस्वी करून दाखवला. टिम इंडियाच सर्वांनीच कौतुकं केलं, मात्र समोर उसळलेला मानवी सागर आणि त्यात पोलिसांची भूमिका पाहून विश्वविजेत्यांनी पोलिसांचेच आभार मानले मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर भारतीय संघाचे आगमन झाले. विमानतळाबाहेरच चाहत्यांनी गर्दी केली होती. भारतीय खेळाडूंची बस ही मरीनड्राइव्हच्या दिशेने जात असताना रस्त्यांच्या दुतर्फा नागरिक भारतीय संघाला अभिवादन करण्यासाठी उभे होते. तर दुसरीकडे मरीनड्राइव्ह येते विजयी मिरवणूकीसाठीची गर्दी वाढतच होती. नियंत्रणाबाहेर गेलेली गर्दी संभाळण्यासाठी पोलिसांना वाढीवकूमक बोलवावी लागली. मरीनड्राइव्हचा परिसरात पाय ठेवायलाही जागा नसताना. टिम इंडिया NCPA पर्यंत पोहचणार कशी असा प्रश्न निर्माण झाला असताना. पोलिसांनी टिम इंडियाची बस मेट्रो सर्कलहून पुढे उच्च न्यायालयाच्या मार्गाने मंत्रालय वाल्मिकी चौकातून, उषा मेहता चौकातून NCPA पर्यंत पोहचवली. ऐनवेळी रूट बदलल्यामुळे क्रिकेटपट्टूंची सुरक्षाही तितकीच महत्वाची होती.