Mumbai Nashik Highway Potholes : मुसळधार पाऊस आणि खड्ड्यांमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी
Mumbai Nashik Highway Potholes : मुसळधार पाऊस आणि खड्ड्यांमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी
मुंबई नाशिक महामार्ग याहीवर्षी खड्ड्यांमुळे टीकेचा धनी बनत आहे, ठाण्यापासून ते भिवंडी पडघा टोल नाक्यापर्यंत दोन्ही बाजूने वाहने थांबून थांबून पुढे जात आहेत, याचे मुख्य कारण म्हणजे अर्धवट झालेले महामार्गाचे काम आणि त्यामुळे पडलेले खड्डे, दरवर्षी हा महामार्ग दुरुस्त करून खड्डे पडणार नाहीत असे आश्वासन दिले जाते मात्र याही वर्षी परिस्थिती जैसे थे बघायला मिळते आहे, तासनतास वाहतूक कोंडी मध्ये अडकल्याने नागरिकांचा संयम सुटला आहे, तर काल आमदार सत्यजित तांबे हे देखील याच महामार्गावर 6 ते 7 तास अडकल्याने त्यांनी देखील थेट कल्याण स्टेशन गाठत लोकलने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतल्याचे ट्विट करून सांगितले, यावरून सामान्य नागरिकांना रोज किती तास वाहतूक कोंडी मध्ये अडकावे लागते हे दिसून येते.