Mumbai Andheri Accident : रस्ता ओलांडताना बाईकने उडवलं, तरुण डिव्हायडरवर पडला|CCTV
Mumbai Andheri Accident : रस्ता ओलांडताना बाईकने उडवलं, तरुण डिव्हायडरवर पडला|CCTV
मुंबईच्या अंधेरी पूर्वेत सहार रोडवर बाईकचा विचित्र अपघात, भरधाव वेगाने जात असलेली बाईक रस्ता क्रॉस करणारा व्यक्तीला उडवला, बाईकचा या अपघातात रस्ता क्रॉस करणारा व्यक्ती गंभीर जखमी. संपूर्ण घटना तिथे असलेला सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद. शुक्रवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास अंधेरी सहार रोडवर एक व्यक्ती चालत रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगाने जात असलेली बाईकने उडवला, अपघातचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस बाईक चालकाचा शोध घेत आहे...
हे ही वाचा...
उद्धवजी फक्त एक दिवस सभागृहात येऊन चालणार नाही, रोज पूर्णवेळ या. जेणेकरून तुम्हाला जनतेचे गंभीर प्रश्न कळतील. असा सल्ला देत महायुती सरकारचे मंत्री व पूर्वश्रमीचे उद्धव ठाकरेंचे सहकारी आशिष जयस्वाल यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांनी रोज विधान परिषदेत यायला हवं. ते विधान परिषदेचे सदस्य असून सदस्य जेव्हा सभागृह येतो, तेव्हा त्याला सामान्य जनतेचे प्रश्न कळतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी रोज सभागृहात यायला पाहिजे आणि पूर्णवेळ सहभागी झालं पाहिजे. तसेच त्यांना जनतेचे गंभीर मुद्दे कळतील असे म्हणत उद्धव ठाकरेंना शिवसेना शिंदे गटाचे नवनियुक्त मंत्री आशिष जयस्वाल यांनी टोला लगावला आहे. उद्धवजी प्रत्येक अधिवेशनात फक्त एक दिवस येऊन होणार नाही. त्यासाठी रोज येऊन पूर्णवेळ बसून सर्व संसदीय आयुधांचा वापर केला पाहिजे. सभागृह हे जनतेचे प्रश्न मांडण्याचे फोरम असून उद्धव ठाकरेंनी त्याचा लाभ घ्यायला हवं असे ही आशिष जयस्वाल म्हणाले.