एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sambhaji Raje : आता राज्याचा कुठलाही रोल राहिलेला नाही, केंद्राने भूमिका स्पष्ट करावी : संभाजीराजे

अहमदनगर :  मराठा आरक्षण प्रश्नावर केंद्र सरकारने आता आपली भूमिका स्पष्ट करावी आणि मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही ते ठरवावं. या प्रकरणातील राज्याची भूमिका संपली असून केंद्राने आता 102 व्या घटनादुरुस्तीसंबंधी वटहुकूम काढावा आणि घटनादुरुस्ती करुन राज्यांना अधिकार द्यावेत अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे. मराठा आरक्षणासंबंधी केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 

शासकीय बाबींना वेळ लागतोय म्हणून राज्य सरकारला वेळ दिलाय. त्यामुळे मराठा आरक्षणासंबंधी सुरु झालेलं मुक आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं आहे, ते पूर्णपणे बंद केलं नाही असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. गायकवाड अहवालात ज्या त्रुटी आहेत त्या भरुन काढून परत तो अहवाल राज्यपालांच्या माध्यमातून राष्टपतींकडे द्यायचा असा एक पर्यांय आहे. त्यानंतर राष्ट्रपती मागास आयोगाला सूचना देऊ शकतील. अशा पद्धतीने राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या माध्यमातून मराठा आरक्षण मिळू शकते असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. अपवादात्मक परिस्थिती आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रपती यांच्याकडे जावं लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "मराठा आरक्षणासंबंधी राज्याची भूमिका संपली असून आता केंद्र सरकारला आता लवकरात लवकर भूमिका स्पष्ट करावी लागेल. मराठ्यांना आरक्षण द्यायचं का नाही ते आता केंद्र सरकारने ठरवावं. राज्य फक्त आता शिफारस करु शकेल. त्यामुळे आता केंद्राची जबाबदारी आहे.

"सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर या निकालाच्या 102 व्या घटनादुरुस्तीच्या मुद्द्यावर केंद्राने केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. 102 व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली. या आयोगाच्या स्थापनेनंतर एस ई बी सी आरक्षणाचे नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींच्या सहीने केवळ याचा आयोगाला असल्याचे निकालात म्हटले आहे. राज्यांना हे अधिकार नसल्याचं मत खंडपीठाने नोंदवलं होतं. या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने अपील केलं होतं. पण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आज सुप्रीम कोर्टात केंद्राचीही पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. याचा अर्थ एस ई बी सी सारखे नवे प्रवर्ग निर्माण करायचे असतील तर हा निर्णय केवळ केंद्रीय पातळीवरच होऊ शकतो.

महाराष्ट्र व्हिडीओ

Nagpur Chaiwala : नागपुरातील या चहावाल्याला शपथविधीचं आमंत्रण
Nagpur Chaiwala : नागपुरातील या चहावाल्याला शपथविधीचं आमंत्रण

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
Shivam Dube : 6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्याकडूनही जोरदार धुलाई, मुंबईचा धावांचा डोंगर
शिवम दुबे अन् सूर्यकुमार यादवची बॅट तळपली, मुंबईच्या फलंदाजांकडून गोलंदाजांची धुलाई
Kapaleshwar Mandir : कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
Uddhav Thackeray: विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Jupiter Hospital : पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरूNagpur Chaiwala : नागपुरातील या चहावाल्याला शपथविधीचं आमंत्रणDrumstick rate Baramati : 100 रूपये पावशेरच्या दरानं विकली जातेय शेवग्याच्या शेंगाTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12 PM : 3 डिसेंबर 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
Shivam Dube : 6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्याकडूनही जोरदार धुलाई, मुंबईचा धावांचा डोंगर
शिवम दुबे अन् सूर्यकुमार यादवची बॅट तळपली, मुंबईच्या फलंदाजांकडून गोलंदाजांची धुलाई
Kapaleshwar Mandir : कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
Uddhav Thackeray: विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
शेवग्याच्या वरणासाठी  डिसेंबरभर थांबावं लागणार? शेवगा 600 रुपये किलो! राज्यातील शेतकऱ्यांना फटका
शेवग्याच्या वरणासाठी डिसेंबरभर थांबावं लागणार? शेवगा 600 रुपये किलो! राज्यातील शेतकऱ्यांना फटका
मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 
मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 
IPO Update : 125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Embed widget