Shivam Dube : 6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्याकडूनही जोरदार धुलाई, मुंबईचा धावांचा डोंगर
Shivam Dube : मुंबईच्या संघातून खेळताना शिवम दुबेनं 7 षटकार मारत दमदार कमबॅक केलं आहे. शिवम दुबे सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत खेळत आहे.
हैदराबाद : भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख खेळाडू सध्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे सामने सध्या सुरु आहेत. श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांच्या सारखे दिग्गज खेळाडू सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत आहेत. मुंबई आणि सर्विसेस यांच्यातील मॅच सुरु आहे. मुंबईनं पहिल्यांदा फलंदाजी करताना सर्विसेस पुढं धावांचा डोंगर उभा केला आहे. शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी दमदार फलंदाजी केली. शिवम दुबेनं 7 षटकार मारत जोरदार कमबॅक केलं. सूर्यकुमार यादवनं देखील अर्धशतक केलं आहे. त्यानं चार षटकार मारले.
शिवम दुबेनं 36 बॉलमध्ये 2 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीनं 71 धावा केल्या. शिवम दुबेचं स्ट्राईक रेट जवळपास 200 इतकं होतं. सूर्यकुमार यादवनं 46 बॉलमध्ये 70 धावा केल्या. सूर्यकुमार यादवनं 4 षटकार आणि 7 चौकार मारले. मुंबईकडून अजिंक्य रहाणेनं 22 आणि कॅप्टन श्रेयस अय्यरनं 20 धावांची खेळी केली.
मुंबईनं 20 ओव्हरमध्ये 4 विकेटवर 192 धावा केल्या आहेत. मुंबईच्या डावाच्या अखेरच्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी जोरदार फटकेबाजी केली.
शिवम दुबे दुलिप ट्रॉफीमध्ये दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर शिवम दुबे पहिली मॅच खेळत होता. दुखापतीमुळं मधल्या काळात शिवम दुबे दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश विरूद्धच्या मालिकेला मुकला होता. दुखापतीतून बरं झाल्यानंतर शिवम दुबे पहिली मॅच खेळत होता. या मॅचमध्ये त्यानं 7 षटकार मारले. शिवम दुबेनं आजच्या मॅचमध्ये गोलंदाजी देखील केली.
मुंबईनं 4 बाद 192 धावा करत सर्विसेससमोर 193 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सर्विसेसच्या संघानं 14 ओव्हरमध्ये 5 बाद 110 धावा केल्या आहेत.
सूर्यकुमार यादवची फटकेबाजी
Mumbai have set a target of 193 in front of Services 🎯
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 3, 2024
Suryakumar Yadav (70 off 46) and Shivam Dube (71*off 37) put on a solid 130-run stand!
Can Services chase it down? #SMAT | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/fYSxpPPSvj pic.twitter.com/0KOJI9uxuy
शिवम दुबेची फटकेबाजी
Mumbai have set a target of 193 in front of Services 🎯
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 3, 2024
Suryakumar Yadav (70 off 46) and Shivam Dube (71*off 37) put on a solid 130-run stand!
Can Services chase it down? #SMAT | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/fYSxpPPSvj pic.twitter.com/0KOJI9uxuy
दरम्यान, बीसीसीआयनं राष्ट्रीय संघातून क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमधील स्पर्धेतही क्रिकेट खेळण्यास सांगितल्यानं दिग्गज क्रिकेटपटू देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळतंय.
इतर बातम्या: