एक्स्प्लोर
Special Report Banarao Lonikar : विधानसभेत लोणीकर विरुद्ध विरोधक वाद, माफीची मागणी कायम
आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांवरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी लोणीकर यांनी माफी मागावी यासाठी विरोधक आक्रमक झाले होते. काही दिवसांपूर्वी लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा गदारोळ सुरू झाला. यापूर्वी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस सदस्य नाना पटोले यांचे एका दिवसासाठी निलंबन झाले होते, त्यावेळी पटोले लोणीकर यांच्या विधानावरूनच आक्रमक होते. या पार्श्वभूमीवर लोणीकर यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिले. "मी जे बोललोच नाही, मी शेतकरी विरोधी बोललो अशा प्रकारचे जे वक्तव्य काही सदस्यांनी केले आहे, त्याच्यामध्ये राजकारण आहे," असे लोणीकर म्हणाले. त्यांच्या बोलण्यादरम्यान विरोधक 'माफी मागा' अशा घोषणा देत होते. या घोषणा ऐकून लोणीकरही आक्रमक झाले. "मी गेली चाळीस वर्षे राजकारणात आहे आणि शेतकऱ्यांचे पंचवीस-पंचवीस हजार लोकांचे मोर्चे काढले, आंदोलनं केली. पुढची शंभर वर्षे माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. मी शेतकऱ्यांच्या विरोधी बोललेलो नाही, काही लोक राजकारण करतायत," असे त्यांनी सांगितले. "माझ्या मृत्यूनंतर माझ्या हाडं माझ्या हाडंसुद्धा म्हणतील की मी शेतकरी आहे," असेही त्यांनी नमूद केले. मात्र, सभागृहातून बाहेर येताच विजय वडेट्टीवार यांनी लोणीकर आणि सत्ताधाऱ्यांवर पुन्हा टीका केली. लोणीकर यांनी खुलासा करताना 'मी असं बोललोच नाही' असे म्हटले, पण त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. आदित्य ठाकरे यांनीही लोणीकर यांनी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांची माफी मागावी या मागणीवर ठाम राहिले. "आमची मागणी स्पष्ट होती की तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागा," असे ठाकरे म्हणाले. लोणीकर माफी मागायला तयार नसल्याने संपूर्ण भाजपा आणि एशियन सी गटाची भूमिका लोणीकर यांच्या वक्तव्याला पाठिंबा देणारी असल्याचे विरोधकांनी म्हटले. विरोधकांनी सभागृह बंद पाडले. लोणीकर यांनी माफी मागावी अशी विरोधकांची मागणी आहे. त्यामुळे आता लोणीकर विरुद्ध विरोधक हा वाद अधिवेशनात असाच सुरू राहणार की लोणीकर माफी मागून या वादावर पडदा टाकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (एबीपी माझा ब्युरो रिपोर्ट).
महाराष्ट्र
अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र
भारत





















