एक्स्प्लोर

Mihir Shah : मुलगा मिहीरचा कारनामा ; वडील राजेश शाहांना राजकीय शिक्षा

Mihir Shah :  मुलगा मिहीरचा कारनामा ; वडील राजेश शाहांना राजकीय शिक्षा  वरळी हिट अॅड रन प्रकरणातील (Worli Hit And Run Case) मुख्य आरोपी मिहीर शाहाला (Mihir Shah) शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गाडीची नंबर प्लेटही गहाळ झाली असून तिचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच आरोपीने ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी केल्याचा पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. आरोपीला कोणी मदत केली याच तपस करायचा असून आरोपीच्या जास्तीत जास्त कस्टडीची मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली होती.  गुन्हा केल्यानंतर कारच्या नंबरप्लेटची विल्हेवाट कुठे लावली याची माहिती आरोपी देत नाही. तसेच त्याला पळून जाण्यासाठी कुणी मदत केली याचीही माहिती आरोपी देत नाही असा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आला. गुन्ह्यातील कार ही कोणाची आहे ,ती त्याला कुणी वापरायल दिली याच तपास होणे गरजचे आहे असं पोलिसांनी सांगितलं.   ओळख लपवण्यासाठी केस कापले आणि दाढी काढली अपघात झाल्यानंतर आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी गाडीतच केस आणि दाढी कापल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. आरोपीच्या वडिलांनी अपघाताचा मुख्य पुरावा असलेली गाडी लपवण्याचा प्रयत्न केल्याचं तपासातून स्पष्ट झालं आहे.   आरोपी कुठल्याही थराला जावू शकतात. न्यायालयात सहानभूती मिळवण्यासाठी आरोपीकडून प्रयत्न सुरू आहे. वरळी अपघातात एका महिलेची हत्या झाली आहे. त्यामुळे पोलिसांना तपास करण्यासाठी आरोपीची जास्तीत जास्त कस्टडी मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.   कुठल्याही पुराव्याला धक्का नाही, मिहीरच्या वकिलांचा दावा सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर मिहीर शाहाच्या वकिलांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले की, यातील एका आरोपीला मंगळवारी हजर  केले आहे. आरोपीकडून तपासाला सहकार्य केलं जात आहे. तपासात 95 टक्के माहिती आणि पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. आम्ही कुठल्याही पुराव्यांना धक्का लावलेला नाही. आरोपीचे रक्ताचे नमुनेही घेतलेले आहे.   मिहीर शाहाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवून वरळीमधील अॅट्रिया मॉलजवळ कावेरी नाखवा या महिलेचा जीव घेतला होता. त्यानंतर तो फरार झाला. आता पोलिसांनी दोन दिवसांनंतर त्याला शहापूरमधून अटक केली.  दरम्यान, वरळी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून आरोपीचा फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Babanrao Taywade OBC : आश्वासनाला तडा गेल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर : बबनराव तायवाडे
Babanrao Taywade OBC : आश्वासनाला तडा गेल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर : बबनराव तायवाडे

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Babanrao Taywade OBC : आश्वासनाला तडा गेल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर : बबनराव तायवाडेDhule Suicide Case : धुळ्यात एका कुटुंबातील चौघांची आत्महत्या, कारण स्पष्ट नाहीNagpur Congress Protest : नागपुरात अनिल बोंडे आणि गायकवाडांविरोधी घोषणाबाजी आणि आंदोलनBuldhana CM Eknath Shinde Welcome : बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांचं स्वागत, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Embed widget