MHADA : म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, अनामत रकमेत दुपटीने वाढ होण्याची शक्यता
MHADA : म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, अनामत रकमेत दुपटीने वाढ होण्याची शक्यता
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीच्या जाहिरात प्रसिद्धी प्रक्रियेचे काम अंतिम टप्प्यात असून कोकण मंडळानेही पुणे मंडळाप्रमाणे अनामत रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार २० टक्के योजना, पंतप्रधान आवास योजना आणि म्हाडा गृहप्रकल्पातील घरांसाठीची अनामत रक्कम दुप्पट केली आहे. तर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य वर्गातील घरांसाठी एकूण किमतीच्या १० टक्के अनामत रक्कम म्हणून घेण्याचे निश्चित केले आहे. यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो लवकरच म्हाडा उपाध्यक्षांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कोकण मंडळातील घरांसाठी ठाणे, नवी मुंबई आणि वसई-विरारमधील घरांसाठी अर्ज करणे इच्छुकांना आर्थिकदृष्टय़ा अडचणीचे ठरणार आहे.