Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 6 PM : ABP Majha
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 6 PM : ABP Majha
२०२२-२३ मध्ये एसटी बसचे २८३ अपघात. ३४३ लोकांनी गमावला जीव, यंदाच्या वर्षात नोव्हेंबरपर्यंत २ हजार २८६ अपघातात २०१ लोकांचा मृत्यू, तर ३३४ लोक जखमी.
नाशिक जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यात १२० बस अपघात, अपघातात २२ जणांचा मृत्यू, १०२ पैकी ४६ अपघात एसटी महामंडळाच्या चालकाच्या चुकीमुळे झाल्याचं समोर.
साताऱ्यातील कास पठारावर रेव्हपार्टी दरम्यान झालेल्या भांडणात तीन जण जखमी, पार्टीत दारू पिऊन धिंगाणा घालतानाचाही व्हिडीओ व्हायरल, मात्र अद्याप याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल नाही.
बीडमध्ये राष्ट्रवादीचे वाल्मिक कराड, विष्णू चाटेवर खंडणीचा गुन्हा, पवनचक्की कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेमार्फत मागितली खंडणी.
रत्नागिरीत जिंदाल कंपनीच्या टँक क्लीनिंग दरम्यान वायूगळती, विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास, नांदीवडे माध्यमिक विद्यामंदिरातील अनेक विद्यार्थ्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू.
महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती ३१ डिसेंबर पूर्वी सुरू करा, अनेक उमेदवारांचे वय वाढत असल्यानं भरती लवकर घेण्याची स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची मागणी.