(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maval Lok Sabha : मावळ लोकसभेत मविआत तिढा...श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला भाजप - राष्ट्रवादीचा विरोध
मावळ लोकसभेतुन यावेळचा खासदार कमळाच्या चिन्हावर निवडून आणणार. असा संकल्प मावळ विधानसभेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. पण तो उमेदवार शिंदे गटाचे श्रीरंग बारणे नको तर मावळमधील भाजपचे बाळा भेडगे चं असतील. असे सूतोवाच मावळचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे यांनी केलाय. तर मी मावळ लोकसभेची निवडणूक लढावी अशी इच्छा कार्यकर्त्यांची असल्याचं बोलून बाळा भेगडेंनी जाहीर केलं. भाजप युवा मोर्चाने आयोजित कार्यक्रमात ही मागणी करण्यात आली. त्यामुळं श्रीरंग बारणेंचे टेन्शन दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेनीं बारणेंना भाजपने ही उमेदवारी देऊ नये, असं म्हणत विरोध कायम ठेवला आहे. अशातच आता भाजपने कमळावर बारणे नाही, तर बाळा भेगडेंना तिकीट देण्याची मागणी केली आहे. मावळ लोकसभेत महायुतीचा वाढलेला हा तिढा बारणेंची डोकेदुखी वाढवत आहे.