Marathi language : योग्य निर्णय ! ल्या सर्व खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा
Maharashtra Goverment मुंबई: राज्यातील सर्व खाजगी आणि सरकारी सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा (Marathi Language) अध्ययन आणि अध्यापन सक्तीचे करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमातील शाळांमध्ये मराठी विषयाची परीक्षा घेऊन श्रेणी स्वरूपात मूल्यांकन न करता गुणांकन (मार्क्स देऊन )पद्धतीने मराठी भाषा विषयाच्या परीक्षेचे मूल्यांकन केले जाणार आहे.
मराठी भाषेचे (Marathi Language) श्रेणी स्वरूपात मूल्यांकन होत असताना इतर माध्यमातील शाळांमध्ये मराठी भाषा विषय गांभीर्याने शिकवलं जात नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारकडून (Maharashtra Goverment) मराठी भाषा सक्तीच्या अंमलबजावणी संदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. 1 एप्रिल 2020 रोजी शिक्षण विभागाकडून मराठी भाषा सर्व माध्यमातील शाळांमध्ये सक्तीची करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला होता. 2020-21 पासून राज्यभरातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यासंदर्भात पाऊल टाकण्यात येत आहेत.