Manoj Jarange Maratha Reservation : सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्राबाबत आज अध्यादेशाची शक्यता
Manoj Jarange Maratha Reservation : सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्राबाबत आज अध्यादेशाची शक्यता
राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज कुणबी प्रमाणपत्रासाठी सगे-सोयऱ्यांच्या संदर्भातील अधिसूचना निघण्याची शक्यता आहे. त्यासोबत आरक्षणासाठी आणखी इतर दोन अधिसूचना सरकार काढणार आहे. ज्या सगेसोयरे मुद्यांवर बऱ्याच दिवसांपासून खल सुरू होता, त्या सगे-सोयऱ्यांच्या संदर्भानुसार त्यांनाही प्रमाणपत्र मिळेल. भूमीअभिलेखकडील ३३/३४ नुसार असलेली इसमवारी, खातेवारी नमुना, पोलिस पाटील आणि इतर नोंदीच्या अनुषंगाने प्रमाणपत्र देण्याची पद्धती ठरेल. या अधिसूचना आज निघण्याची शक्यता आहे. या नव्या अध्यादेशाचा ड्राफ्ट मनोज जरांगे यांना पाठवण्यात येईल. त्यातील दुरुस्त्या पूर्ण झाल्यानंतर तो आज अध्यादेश निघेल अशी शक्यता आहे. तसंच आज मनोज जरांगे मराठा आरक्षण संदर्भात आजूबाजूंच्या गावांत भेटीगाठी घेतील.