Manoj Jarange : सगळ्या आरक्षणाची फेररचना करा; मनोज जरांगेंची सरकारकडे नवीन मागणी
Manoj Jarange : सगळ्या आरक्षणाची फेररचना करा; मनोज जरांगेंची सरकारकडे नवीन मागणी मराठ्यांच्या नोंदी रद्द करायला लावत आहेत हे लोकांना पटत नाही. हैद्राबाद गॅझेट सातारा संस्थान या ठिकाणी नोंदी आहेत. आमच्याकडून ओबसी बंधावाला (OBC) दुखावणार नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं विधान मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलं. हिंगोलीमध्ये मनोज जरांगे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. सरकारने मला उघडा पडायचं आणि संपवण्याचे ठरवले आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. कुटुंबाला मी बाजूला ठेवले आहे त्यामुळे समाजाने (Maratha Reservation) मला उघडा पाडू देऊ नये, असं मनोज जरांगे यावेळी म्हणाले. मराठ्यांना त्रास देणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांनाही पाडा- आगामी विधानसभेच्या निवडणुकीत 288 जागांवर उमेदवार उभे करायचे ठरवले, तर सर्व जाती-धर्मातील उमेदवार देऊ, सर्व जाती धर्मातील उपमुख्यमंत्री करु, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. तसेच मराठ्यांना त्रास देणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांनाही पाडा, असं विधान मनोज जरांगे यांनी केलं आहे. मला राजकारणात जायचं नाही माझा जन चळवळीवर विश्वास आहे. तुम्ही आत्महत्या करू नका, तुम्ही आत्महत्या करत असल्याने मी खचतोय. लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे, असं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केलं.