Manoj Jarange : आरक्षणाबद्दल काय केलं ते सांगा, जरांगेंकडून सरकारला 17 तारखेचा अल्टीमेटम
Manoj Jarange : आरक्षणाबद्दल काय केलं ते सांगा, जरांगेंकडून सरकारला 17 तारखेचा अल्टीमेटम
Manoj Jarange : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) काय निर्णय घेतला ते 17 डिसेंबरपर्यंत सांगा, असा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिला आहे. येत्या 17 तारखेला महाराष्ट्रातील सगळ्या मराठा समाजाची अंतरवाली सराटीत बैठक बोलावली आहे. जर 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर पुढील दिशा काय? त्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावल्याची माहिती जरांगे पाटील यानी दिली. दरम्यान, जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यवर देखील टीका केली. मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांनी बोलू नये, त्यांनी खुशाल झोपावं, त्यांनी संरक्षण घ्यावं,असं म्हणत जरांगे पाटील यांनी नाव न घेता भुजबळांवर निशाणा साधला.
17 डिसेंबरपला आंतरवाली सराटीत सकाळी 9 वाजता बैठक होणार आहे. 12 वाजेपर्यंत सर्वांचा परिचय होईल.24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर पुढील दिशा काय? त्यावर 12 ते 3 वाजता चर्चा होईल,असे जरांगे पाटील यांनी सांगितलं. अंतरवालीला जिथे सभा झाली होती तिथे बैठक होणार आहे.