भुजबळ विश्वासघातकी, त्यांना कोण कशाला गोळी घालेल? मनोज जरांगेंचा सवाल
भुजबळ विश्वासघातकी असल्याचीही टीका केली आहे. तर पोलिसांनीच एसआयटीला फायरिंगबाबत माहिती दिली असं भुजबळांनी म्हटलंय.
![भुजबळ विश्वासघातकी, त्यांना कोण कशाला गोळी घालेल? मनोज जरांगेंचा सवाल Manoj Jarange Slams Chhagan Bhujbal On His Statement Maratha Reservation Maharashtra News भुजबळ विश्वासघातकी, त्यांना कोण कशाला गोळी घालेल? मनोज जरांगेंचा सवाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/26/097100d7cfd61041bcf19807125804521700978039942737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मला गोळी मारली जाऊ शकते, भर सभागृहात छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) खळबळजनक दावा केला. त्यावर भुजबळांना कोण कशाला गोळी घालेल? असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगेनी (Manoj Jarange) केला आहे. भुजबळ विश्वासघातकी असल्याचीही टीका केली आहे. तर पोलिसांनीच एसआयटीला फायरिंगबाबत माहिती दिली असं भुजबळांनी म्हटलंय.
मनोज जरांगे म्हणाले, गावागावात आंदोलन उभे करायचे, कोत्त्याची भाषा करायची आणि कोण तुला गोळी मरणार, कोण तो पोलीस सांगणार गोळी मारणार? काहीपण बोलतो. नाशिक , वाशिम, जळगाव, हिंगोलीत आम्हाला अनेक अडचणी आल्या,आम्ही सांगित्या नाहीत. अमच्या जीवाला धोका असा रिपोर्ट पोलिसांनी का दिलं नाही? आमच्या सोबत जे घडलं ते 24 तारखेला सांगणार आहे. दौऱ्यामध्ये काही संशय आला होता मात्र पोलिसांनी काही सांगितल नाही. आमच्या दौऱ्याला पोलीस संरक्षण मिळत नव्हते 30-30 किलोमीटर पोलीस नसायचे.
17 डिसेंबरला आंदोलनाची दिशा ठरेल : जरांगे
जरांगे म्हणाले, 24 डिसेंबरला सरकारने आरक्षण दिलं नाही तर शांततेत मात्र मोठं आंदोलन उभं करण्यात येईल. अजून आंदोलनाची दिशा ठरलेली नाही, 17 तारखेला जी दिशा ठरेल तसे आंदोलन होईल, असे आंदोलन होईल. अजून आंदोलन कसे असणार हे ठरलेले नाही, ती समाजाची भावना असू शकते. सविस्तर चर्चा होईल नेमकं आंदोलन कसे करायचे? आम्ही 24 तारखेनंतर ही बैठक घेणार होती. त्यामुळे नाईलाजास्तव 17 तारखेला बैठक घ्यावी लागत आहे. आमची फसवणूक झाली, गुन्हे मागे घेतले नाहीत. लेखी दिले नाही, त्याच्या सांगण्यावरून सरकार काम करतो गप्पा मारत नाही. पूर्वीच मराठा आता राहिला नाही. शांततेत आता आंदोलन करेल कुठल्याही नेत्याला न जुमानता रस्त्यावर उतरून आंदोलन करू.
अध्यक्ष आणि जातीचा काय संबंध? जरांगेचा सवाल
कुणबी प्रमाणपत्र सरसकट मराठ्यांना द्यावं या भूमिकेवर आम्ही ठाम आहे. ज्याला घ्यायचे त्यांनी घ्यावे , ज्याला घ्यायचे नाही त्यांनी घेऊ नये. अध्यक्ष आणि जातीचा काय संबंध? त मराठ्यांना काही द्यायचं झाल की लगेच जात काढली जाते. phd चे विद्यार्थी, mpsc विद्यार्थी आहेत यांचं प्रश्न तातडीने काढा. महाराष्ट्रातील सर्व केस मागे घ्या, असे जरांगे म्हणाले.
हे ही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)