भारतरत्न Lata Mangeshkar यांच्या महाविद्यालयाला मंगेशकर कुुटुंबीयांचा आक्षेप, काय आहे प्रकरण?
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतलांय. मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयावर मंगेशकर कुुटुंबीयांनी तीव्र आक्षेप घेत नापंसतीचं पत्र मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डाँक्टर सुहास पेडणेकर यांना पाठवलंय. हे पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती असून त्यात मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्तं करत आक्षेप घेण्यात आलांय. भारतरत्नं गानसम्राज्ञी लता मंगेशकर हयातीत असताना राज्य सरकारने त्यांच्या इच्छे नुसार मास्टर दिनानाथ मंगेेशकर आंतरराष्ट्रीय शासकिय संगीत महाविद्यालय स्थापन करण्यासाठी मंगेशकर कुटुंबातील सदस्य आणि संगीत क्षेत्रातील तज्ञ यांची समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारसी नुसार मुंबई विद्यापीठातील जागा पहाणी करून निश्चित करण्यात आली होती. मात्र मुंबई विद्यापीठाने समितीने सुचवलेली जागा लता दीदींच्या हयातीत उपलब्धं करून न दिल्यामुळे मंगेशकर कुटुंबीयांचे स्वप्नं त्यांच्या हयातीत पुर्ण होऊ शकले नाही. याचा खेद वाटत असल्याचं मंगेशकर कुटुंबीया़ंनी या पत्रात नमुद केलांय. त्यामुळे मंगेशकर कुटुंबीयांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डाँक्टर सुहास पेडणेकर यांच्या कारभारावर तीव्र आक्षेप नोंदवलांय.