Majha Maharashtra Majha Vision|वीज बिलाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसमध्ये विसंवाद नाही: बाळासाहेब थोरात
कृषी कायद्याबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली आहे. आम्ही त्यावर चर्चा करुन शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेणार आहेत, असं राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमात ते बोलत होते. सोबतच वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसमध्ये विसंवाद नसल्याचंही ते म्हणाले.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, "केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यातील दोष आम्ही दाखवत आहोत. हे कायदे नफोखोरांसाठीच बनवले आहेत. या कायद्याविरोधात सहकारी पक्ष आमच्यासोबत आहेत. त्याबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली आहे. आम्ही त्यावर चर्चा करुन शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेणार आहेत."
तर वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसमध्ये विसंवाद आहे का याविषयी ते म्हणाले की, "वाढीव वीज बिलाबाबत बैठक झाली होती. त्या बैठकीला अशोक चव्हाण उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांनी नितीन राऊतांनी केलेल्या घोषणेवर भाष्य केलं असावं."
#MarathiNews #ABPMajha #ABPMajhaLiveNews