Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :8 सप्टेंबर 2024: ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :8 सप्टेंबर 2024: ABP Majha
अन्नत्याग आंदोलनामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळं उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील MGM रुग्णालयात दखल करण्यात आलं आहे. चार दिवस अन्नत्याग केल्यामुळे रविकांत तुपकर यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण अतिशय कमी झालं आहे. यामुळं किडणीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
तुपकरांवर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेतकरी प्रश्नी 11 सप्टेंबर रोजी रविकांत तुपकरांची राज्य सरकार सोबत मुंबईत बैठक होणार आहे.
रविकांत तुपकरांच्या नेमक्या मागण्या काय?
महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. परंतू, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य भाव मिळत नाही. उत्पादन खर्चही निघत नाही आणि कापूस व सोयाबीनला उत्पादन खर्चाचा अर्धा भाव देखील मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याच कारणासाठी सोयाबीन आणि कापसाला योग्य दर मिळवण्यासाठी रविकांत तुपकर यांचे आंदोलन सुरु आहे. मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे (Extreme heavy rain) शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची शंभर टक्के भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. याशिवाय, फेब्रुवारीपर्यंत मिळायला हवा असलेला पीक विमा (Crop insurance) अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. शंभर टक्के पीक विमा सर्व पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणी तुपकर यांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीन आणि कापूस दरासह पिक विम्याच्या मागणीसाठी रविकांत तुपकर हे लढा देत आहेत.