Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 14 June 2024
Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 14 June 2024
खासदार संदिपान भुमरे आणि मंत्री शंभुराज देसाईंच्या शिष्टाईला यश, सहाव्या दिवशी अखेर मनोज जरांगेंकडून उपोषण स्थगित.
मनोज जरांगेंकडून सरकारला १ महिन्याचा म्हणजे १३ जुलैपर्यंतचा वेळ, ओबीसीतून मराठ्यांना हक्काचं आरक्षण द्या, जरांगेंची सरकारकडे मुख्य मागणी.
एका महिन्यात मागण्या मान्य झाल्या नाही तर विधानसभा निवडणुकीत उतरणार, नाव घेऊन उमेजदवारांना पाडणार, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा.
काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाणांसह सह आमदार मोहन हंबर्डेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट, जरांगेंच्या आंदोलनाला दिला पाठिंबा, यावेळी नांदेड काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित.
अंतरवाली सराटीमध्ये महिला आंदोलकांकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अडवलं, मराठा आंदोलनाबाबत कोणती भूमिका घेणार ते सांगा. महिला आंदोलकांचा दानवेंकडे आग्रह, महिला आंदोलकांची घोषणाबाजी.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर राष्ट्रपतींना भेटणार..तर जरांगेंच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा केला आरोप...
मनोज जरांगे आणि मराठा समाजाची मागणी लवकरच मान्य होईल, त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. आमदार अभिमन्यू पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर प्रतिक्रिया.