Maharashtra Vidhan Sabha Session 2021 : सरकाराने टीकावं, जनतेला टीकू द्यावं : सुधीर मुनगंटीवार
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. राज्य सरकारच्या पत्राला राज्यपालांनी उत्तर धाडलं असलं तरी त्यात काय संदेश दिलाय हे अद्याप समोर आलेलं नाही. एकीकडे काँग्रेस निवडणुकीसाठी आग्रही असताना सत्ताधारी आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांनी मात्र राज्यपालांच्या संमतीशिवाय निवडणूक घेऊ नये अशी भूमिका घेतल्याचं कळतं. विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निवडणूक घेण्यास विरोध दर्शवलाय. त्यामुळे अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी अध्यक्षपदाच्या निवडणूक बारगळणार का अशी चर्चा सुरू झालीय...... तरीही आघाडीच्या नेत्यांनी कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरु केल्यानं नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागलंय....



















