पुरग्रस्तांना मदतीसाठी गेलेल्या भाजप खासदाराचं दगडफेक करून डोकं फोडलं, गंभीर जखमी; आमदारासह इतर नेत्यांवरही हल्ला; शेकडोच्या जमावाकडून 'परत जा' म्हणत नारेबाजी
पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी नगरकाटा येथे भाजप खासदार खगेन मुर्मू यांच्यावर करून हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले असून भाजपने ममता बॅनर्जी सरकारवर गुंडांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे.

jalpaiguri bjp mp khagen murmu attack news: पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीमध्ये (Khagen Murmu Jalpaiguri Violence) शेकडो लोकांच्या जमावाने भाजप खासदार खगेन मुर्मू यांच्यावर हल्ला केला. जमावाने खासदारावर दगडफेक केली, त्यात ते गंभीर जखमी झाले असून डोकं फुटलं आहे. खगेन हे मालदाचे खासदार आहेत. ही घटना जलपाईगुडी जिल्ह्यातील डुअर्स भागातील नगरकाटा येथे घडली. जमावाने भाजप आमदार शंकर घोष (BJP MLA Shankar Ghosh Attack News) आणि खासदारांसोबत असलेल्या इतर नेत्यांवरही हल्ला केला. ते पूरग्रस्त भागात मदत साहित्य वाटण्यासाठी गेले होते. हल्ल्यापूर्वी 500 हून अधिक लोकांनी परत जा अशा घोषणा दिल्या आणि रस्ता अडवला.
ममता बॅनर्जी पूरग्रस्त भागांना भेट देणार (Mamata Banerjee on Jalpaiguri Flood)
हल्ल्यानंतर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये भाजप खासदार रक्ताने माखलेल्या कारमध्ये बसलेले दिसत आहेत. त्यांचा चेहरा खूप रक्तस्त्राव होत होता. त्यांचा पांढरा कुर्ता आणि मफलर देखील रक्ताने माखला होता. ते वारंवार रुमालाने चेहरा पुसताना दिसत होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील (Mamata Banerjee Jalpaiguri Flood Relief Visit) आज पूरग्रस्त भागांना भेट देणार आहेत. आज सकाळी कोलकाताहून निघताना त्यांनी सांगितले होते की ते हासीमारा एअर फोर्स स्टेशनवर उतरतील आणि नंतर पूरग्रस्त नगरकाटा येथे जातील.
पोलिसांच्या उपस्थितीत हल्ला झाला (Suvendu Adhikari Reaction Khagen Murmu Attack)
बंगालमधील भाजपचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी (Police Presence BJP Leaders Attacked Jalpaiguri) यांनीही ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्विट केले की, ममता बॅनर्जी पूर्णपणे घाबरल्या आहेत. आता त्यांनी पॅनिक बटण दाबले आहे आणि एका विशिष्ट समुदायाच्या गुंडांना भाजप खासदार आणि आमदारांवर हल्ला करण्यासाठी चिथावणी देत आहेत. बंगाल भाजप अध्यक्ष समिक भट्टाचार्य यांच्यासोबत पूरग्रस्त भागांचा दौरा करत असताना भाजप खासदारावर क्रूर हल्ला करण्यात आला. पोलिसांच्या उपस्थितीत आमदार डॉ. शंकर घोष यांच्या गाडीवरही हल्ला करण्यात आला. ममता बॅनर्जी, तुम्ही भाजपला घाबरवू शकत नाही.
इतर महत्वाच्या बातम्या


















