एक्स्प्लोर

Gautami Patil Pune: गौतमी पाटील हिला अपघातप्रकरणात मोठा दिलासा, पुणे पोलिसांकडून क्लीन चिट

Gautami Patil Pune Accident: गौतमी पाटील ही पुण्यातील एका अपघातामुळे अडचणीत आली होती. गौतमीच्या कारच्या चालकाने एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी.

Gautami Patil Pune Accident: पुण्यातील नवले उड्डाणपुलाच्या परिसरात झालेल्या अपघात प्रकरणामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिला क्लीन चिट मिळाली आहे. पोलीस तपासात अपघाताच्यावेळी गौतमी पाटील (Gautami Patil) ही गाडीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातावेळी (Pune  Accident) गौतमी पाटील वाहनात नव्हती, अशी माहिती पुणे पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून गौतमी पाटील हिला क्लीन चिट देण्यात आली आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांकडून गौतमी पाटील हिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे हे प्रकरण प्रचंड तापले होते. अपघाताच्यावेळी गौतमी पाटील गाडीत होती की नाही, हे तपासण्यासाठी पुणे पोलिसांनी तब्बल 100 सीसीटीव्हींचे फुटेज पडताळले. त्यामध्ये अपघातावेळी फक्त गौतमी पाटीलचा चालक हाच कारमध्ये उपस्थित असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Pune Crime news)

गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारने 30 सप्टेंबरला पहाटे एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाला होता. या रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या देत गौतमी पाटील हिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. गौतमी पाटील ही सेलिब्रिटी असल्याने तिच्याविरुद्ध कारवाई करताना चालढकल केली जात आहे, असा आरोपही झाला होता. तर कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही याप्रकरणात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पुणे पोलिसांना दिल्या होत्या. त्यामुळे हे प्रकरण प्रचंड तापले होते. या अपघात प्रकरणात गौतमी पाटील हिला शुक्रवारी नोटीस धाडली होती. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका विशेष पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती.  मात्र, या सगळ्या तपासानंतर पोलिसांकडून आता गौतमी पाटील हिला क्लीन चिट देण्यात आली आहे.

Pune crime news: अपघातानंतर गौतमी पाटीलच्या कारचा ड्रायव्हर बदलला?

30 सप्टेंबरला आमचा भाऊ पहाटे पाच वाजता 10 रुपये मिळवण्यासाठी पॅसेंजरची वाट पाहत उभा होता. त्याची रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी होती. त्यावेळी मागून एक कार आली आणि त्याला ठोकून निघून गेली. ही धडक इतकी जोरदार होती की, रिक्षा तीनवेळा पलटी आणि आमचा भाऊ जखमी होऊन रस्त्यावर पडला. या अपघातानंतर ज्या कारने धडक दिली, त्यामधील लोक खाली उतरले आणि निघून गेले. मात्र, अर्धा तासाने एक व्यक्ती पुन्हा आला आणि त्याने त्याच्यासोबत टोईंग व्हॅन आणली होती. टोईंग व्हॅनच्या क्रेनने गौतमी पाटीलची कार टो करुन घटनास्थळावरुन नेण्यात आली. मात्र, आमचा भाऊ जखमी अवस्थेत तसाच रस्त्यावर पडून होता. त्याच्याकडे कोणीही बघितले नाही. रिक्षावाल्यांनी वेळीच मदत केली म्हणून आमच्या भावाचा जीव वाचला. वैद्यकीय तपासणीसाठी दुसऱ्याच कोणालातरी आयत्यावेळी ड्रायव्हर म्हणून सादर करण्यात आले. पोलीस हायवेवरील कॅमेरे बंद असल्याचे सांगत आहेत. पुण्यासारख्या शहरात असे कसे होऊ शकते?, असे अनेक सवाल रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी उपस्थित केले होते.

आणखी वाचा

गौतमी पाटीलला उचलायचं की नाही; चंद्रकांत पाटलांचा थेट DCP ला फोन, म्हणाले...

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Criem: नागपुरातील कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार अन् धमकी, बळजबरीने प्रेग्नन्सी किटद्वारे तपासणीसाठी दबाव; अखेर पंडितेनं पोलीस स्टेशन गाठलं, गुन्हा दाखल
नागपुरातील कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर 20 वर्षीय तरुणाकडून अत्याचार अन् धमकी, बळजबरीने प्रेग्नन्सी किटद्वारे तपासणीसाठी दबाव; अखेर पंडितेनं पोलीस स्टेशन गाठलं, गुन्हा दाखल
Nagpur Crime News : नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या परडीत खळबळ
नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या परडीत खळबळ
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
Sangli Crime News : 14 महिन्याच्या चिमुकलीवर कात्रीने वार करून संपवलं, मानसिक रुग्ण असलेल्या आईला अटक
14 महिन्याच्या चिमुकलीवर कात्रीने वार करून संपवलं, मानसिक रुग्ण असलेल्या आईला अटक

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime News : नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या परडीत खळबळ
नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या परडीत खळबळ
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
SIR Protest Maharashtra: महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
Embed widget