Maharashtra Unseasonal Rain Hailstorm : अवकाळी पावसामुळे कुठे पाऊस, कुठे नुकसान ?
Maharashtra Unseasonal Rain Hailstorm : अवकाळी पावसामुळे कुठे पाऊस, कुठे नुकसान ? शेतकऱ्यांची चिंता वाढवणाऱ्या बातमीने... खरंतर, यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप पिकांचा आधीच चिखल झालाय. त्याततही आता अवकाळी पाऊस रब्बीच्या आणि दुबार पेरणी केलेल्या पिकांच्या मुळावर उठलाय. पालघर, अहमदनगर, पारनेर, महाबळेश्रर, वसई, नाशिक आणि सिन्नरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावलीय. आधीच कोरड्या दुष्काळाचं संकट असताना, आता अवकाळीनेही शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणलंय. ऐन पावसाळ्यात वरूणराजाने पाठ फिरवली, उभी पिकं करपून गेली आणि त्यांची माती झाली. त्यातूनही अनेक शेतकऱ्यांनी उसणवाऱ्या करून, कर्ज काढून दुबार पेरणी केली. त्या पिकांचे कोंब आता कुठे फुलू लागले होते, मात्र त्यावरही आता अवकाळीने वरवंटा फिरवलाय. आंबा, कापूस, तुरीसह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान, मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीतही पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली
![Suresh Dhas Dhananjay Munde Meets|सुरेश धस, धनंजय मुंडेंच्या भेटीचा बोभाटा कुणी केला? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/e9a5dbcbff647f2dfa676a814f5d8c251739728044425718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/359be9e43612143aff2df70942a447501739720791953718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas On Dhananjay Munde :धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या निर्णयाची धस यांनी मागितली माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/323f4bc5e8256f57a5728993a9c47a311739720517327718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Chandrashekhar Bawankule PC | योजना बंद ते लाडक्या बहिणींचं बजेट, बावनकुळेंची पत्रकार परिषद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/0093bc863ece82093f0c432c9a8bb82a1739717193950718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar PC Nashik | धनंजय मुंडेंनी ठरवावं की राजीनामा द्यावा का? अजित पवार स्पष्टच म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/d3cb968e47c7016316edc5cf8ec2984b1739716914406718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)