(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Sensitive Districts : राज्यात दंगली घडवण्याचा कट? संवेदनशील जिल्ह्यांची यादी जाहीर
Maharashtra Sensitive Districts : राज्यात दंगली घडवण्याचा कट? संवेदनशील जिल्ह्यांची यादी जाहीर
नाशिक शहर , नाशिक ग्रामीण, सातारा, धुळे, कोल्हापूर, सांगली, बीड, जालना ,आणि हिंगोली.देशात वेगवेगळ्या ठिकाणी दंगली घडत आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. महाराष्ट्र देखील अति संवेदनशील राज्य म्हणून ओळखलं जातं. त्यामुळेच केंद्रीय रॅपिड ऍक्शन फोर्स महाराष्ट्रातील संवेदनशील आणि अति संवेदनशील शहरांची एक यादी तयार केली आहे. या ठिकाणी या तुकड्या जाऊन शहरात कुठे कुठे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो दंगली सारखी परिस्थिती उद्भवल्यास तिथे काही करता येईल याचा अभ्यास करत आहेत. अशीच एक तुकडी सध्या जालना येथे आहे जालना शहर हे संवेदनशील शहर म्हणून ओळखलं जातं. राज्यातल्या इतर ठिकाणी देखील काही तुकड्या पाठवल्या जाणार असून तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्या शहराचा अभ्यास केला.