Maharashtra Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण लांबणीवर ABP Majha
Maharashtra Samruddhi Mahamarg : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी पर्यंतच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण येत्या 15 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याच्या चर्चा सुरु असताना, आज (10 ऑगस्ट) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा देखील मुहूर्त लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत. राज्यातील सुरु असलेल्या राजकीय घडामोडी आणि समृद्धी महामार्गाचं काही पॅकेजेसमध्ये अजूनही अपूर्ण असल्याच्या बाबींचा हवाला देत ही माहिती समोर आली आहे. मात्र सरकार आणि MSRDC कडून या महामार्गाच्या अधिकाऱ्यांना तयार राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून, कधीही तारीख जाहीर होऊ शकते असंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता हा देण्यात आलेला तिसराही मुहूर्त पुढे ढकलला जाऊ शकतो अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शिंदे-फडणवीस सरकार आल्या आल्या 15 ऑगस्ट ही तारीख जवळपास निश्चित झाली होती. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून याबाबतीत आता सरकार नवीन तारीख जाहीर करते किंवा घाईघाईत लवकरच लोकार्पण करत हे पाहणे महत्त्वाचे आहे.
![Rushiraj Sawant : मुरलीअण्णांचा आदेश, विमानाचा यू टर्न; सावंतांच्या लेकाच्या परतीची INSIDE STORY](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/4e56ebb641a0091cc0adb9d4cb4446481739266860930718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Raigad DPDC Meeting Update : शिवसेना आमदारांशिवाय जिल्हा वार्षिक नियोजन बैठक, महायुतीत धुसफूस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/24f746dffab503059acf6870981571b01739262741267718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas PC : जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकण्याच कळतं का? धस यांचा हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/dd49fa174784ed744dbb96439e80019f1739262206703718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Giriraj Sawant On Rushiraj Sawant : भावाचा बाहेर जातोय असा मेसेज,ऋषिराज सावंतांचे मोठे बंधू 'माझा'वर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/26f988df12270c5d9f420746cc3d54fc1739261459963718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Cotton storage Bag Scam : 'कापूस साठवणूक बॅग घोटाळ्याची माहिती Dhananjay Munde यांना आधीच दिली होती'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/8d2b999b37b3302c25a4619fbe4607731739252455474718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)