एक्स्प्लोर
Maha Politics: 'काँग्रेसला कोणी विचारलंय का?', मनसे नेते Avinash Abhyankar यांचा थेट सवाल
राज्यात महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चेवरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी ठाकरे बंधूंसोबत न जाण्याच्या घेतलेल्या भूमिकेवर मनसे आणि शिवसेना (UBT) नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'काँग्रेसला कोणी विचारलंय का? त्यांचं बोलणं त्यांना लखलाव,' असा थेट टोला मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी लगावला आहे. तर दुसरीकडे, भाई जगताप यांच्या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी 'त्यांना काहीही बोलू दे' अशी प्रतिक्रिया देत विषय टाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी मात्र स्थानिक पातळीवर असे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, ज्यामुळे आघाडीतील मतभेद स्पष्टपणे दिसून येत आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
क्राईम
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















