Maharashtra Police Bharati : राज्यात उद्यापासून 17 हजार 471 जागांसाठी पोलीस भरती
बँड्समन पदासाठी ४१ जागा उपलब्ध असून त्यासाठी ३२ हजार २६ जणांनी अर्ज केले आहेत.
तुरूंग विभागातील शिपाई या पदाच्या एका जागेमागे सुमारे २०७ उमेदवार स्पर्धेत आहेत.
या पदासाठी १८०० जागा उपलब्ध असून ३ लाख ७२ हजार ३५४ अर्ज आले आहेत.
चालक पदासाठी १६८६ जागा उपलब्ध असून १ लाख ९८ हजार ३०० अर्ज (एका जागेमागे ११७) आले आहेत.
सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक अर्ज पोलीस शिपाई पदासाठी आहेत.
९५९५ जागांसाठी ८ लाख २२ हजार ९८४ अर्ज आले असून एका जागेसाठी साधारण ८६ उमेदवार असे याचे गुणोत्तर आहे.
शीघ्र कृती दलातील ४ हजार ३४९ जागांसाठी ३ लाख ५० हजार ५९२ अर्ज (एका जागेसाठी ८० उमेदवार) आले आहेत.
अर्जदारांमध्ये ४० टक्के उमेदवार हे उच्चशिक्षित असून शासकिय नोकरीचे आकर्षण व अन्य क्षेत्रात घटलेल्या संध्यांच्या पार्श्वभूमिवर अर्ज आले असावेत अशी पोलिस सूत्रांची माहित
राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण आहे. भरती प्रक्रिये दरम्यान पाऊस पडल्यास त्या विदयार्थ्यांना पुढील तारीख दिली जाणार
तर उमेदवाराने एका पदासाठी एकदाच फाॅर्म भरणं अपेक्षित, विविध पदांसाठी फाॅर्म भरल्यास दोन्ही ठिकाणच्या मैदानी व परीक्षेची तारीख एक येणार नाही याची काळजी घेतली जाणार