एक्स्प्लोर
Blue Flag Beaches: कोकण किनारपट्टीचा होणार कायापालट, 5 बीचसाठी 20 कोटींचा निधी मंजूर
कोकण किनारपट्टीवरील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. कोकणातील पाच प्रमुख समुद्रकिनाऱ्यांच्या विकासासाठी आणि त्यांना आंतरराष्ट्रीय 'ब्लू फ्लॅग' दर्जा मिळवून देण्यासाठी २० कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दापोलीतील लाडघर, गुहागर, श्रीवर्धन, नागाव आणि डहाणूमधील पर्णका या समुद्रकिनाऱ्यांचा विकास केला जाणार आहे. प्रत्येकी चार कोटी रुपये खर्च करून या किनाऱ्यांवर पर्यटकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण केल्या जातील. उडुपीमधील पादरुबिद्री किनाऱ्याच्या मॉडेलनुसार हा विकास होणार असून, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी लवकरच उडुपीला भेट देणार आहेत. या निर्णयामुळे कोकणातील आंतरराष्ट्रीय पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धाराशिव
बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















