Maharashtra COVID19 Restrictions : राज्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी ABP Majha
ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मध्यरात्रीपासून राज्यात नवे निर्बंध लागू होणार आहेत. राज्यात पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी तर रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जमावबंदीच्या काळात पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र फिरता येणार नाही. संचारबंदीच्या वेळेत फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुणालाही बाहेर फिरता येणार नाही. दरम्यान, दुकानं, शॉपिंग मॉल्स, रेस्टॉरन्ट्स, सलूनसाठी नवी नियमावली जारी करण्यात आलीय. तर स्विमिंग पूल, जिम, ब्युटी पार्लर्स, मैदानं, उद्यानं, पर्यटनस्थळं पूर्णपणे बंद राहणार आहेत. राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. खासगी कार्यालयांनाही ५० टक्के उपस्थितीची मर्यादा घालून देण्यात आलीय.