
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारावर महायुतीच्या नेत्यांची उद्या मुंबईत बैठक- सूत्र
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची उद्या बैठक होण्याची शक्यता...कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता...
शिवसेनेकडून कुणाची मंत्रिमंडळात वर्णी लागणार याची उत्सुकता असतानाच... शिंदेंच्या शिवसेनेला १२ मंत्रिपदं मिळण्याची शक्यताय... नगरविकास खातं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळणार असल्याची सूत्रांची माहितीय... मंत्रिपदांसंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची माहिती आहे.. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशीही फोनवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.. तसंच मंत्रिमंडळ विस्तार १४ डिसेंबरला होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय..
काल रात्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित दादा यांची मेघदूत बंगल्यावर रात्री दिड वाजता उशिरा एक तास खातेवाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक झाली
खाते वाटपाचा तिढा अद्यापही कायम असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती
तीढा सुटत नसल्याने अखेर तिन्ही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता
दिल्लीत अमित शहा यांच्या उपस्थितीत राज्यातील मंत्रिमंडळाची यादी निश्चित होणार असल्याची माहिती





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
