Maharashtra Assembly Monsoon Session : आरक्षणाच्या मुद्द्यावरून सभागृह तापलं
Maharashtra Assembly Monsoon Session : आरक्षणाच्या मुद्द्यावरून सभागृह तापलं सध्या पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत गारवा निर्णाण झालीय... मात्र, अधिवेशन सुरू असताना आता होणाऱ्या वादांमुळे सभागृहातलं वातावरण चांगलंच तापलंय... आणि आता गोंधळाला कळीचा मुद्दा बनलाय आरक्षणाचा मुद्दा... पाहूयात याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट... विधानसभा... गोंधळ... विधान परिषद गोंधळ अधिवेशनाचा आजच्या दिवसात हाती उरला... गोंधळ, गोंधळ आणि फक्त गोंधळ... मग ती विधानसभा असो की विधानपरिषद... सभागृहात असो की बाहेरच्या पायऱ्या...सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर इतके आगपाखड करत होते की, सभापती नीलम गोऱ्हेंवर मार्शल्सना बोलवण्याची वेळ आली...सभागृहातला गोंधळ इतका पराकोटीला पोहोचला की अखेरीस नीलम गोऱ्हे यांनी मार्शल्सना बोलवण्याचे आदेश दिले... मात्र मार्शल्स काही आले नाहीत. त्यामुळे अखेरीस विधान परिषदेचे सुरक्षा प्रमुख आणि विधिमंडळ सचिव यांना देखील तातडीने बोलवण्यात आले. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी त्यांची कडक शब्दात झाडाझडती घेतल्याची माहिती मिळतेय या सगळ्या गोंधळामागे कळीचा मुद्दा होता, आरक्षण... आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी काल सरकारने सह्याद्री अथिगृहात बैठकीचं आयोजन केलं होतं... आणि त्यासाठी सर्वपक्षीयांना निमंत्रणही दिलं होतं... मात्र, आरक्षणाची चर्चा सभागृहात करा, जे आहे ते सर्वांसमोर होऊ द्या, असं म्हणत विरोधकांनी या बैठकीकडे सपशेल पाठ फिरवली... आणि याच मुद्द्यावरून गोंधळाचा अंक सभागृहात आणि बाहेरही पाहायला मिळाला...