Maharashtra Assembly Leader of opposition : विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करणार?
Maharashtra Assembly Leader of opposition : विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करणार?
Maharashtra Assembly Session: शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session) पार पडत आहे. त्यामुळे दुखावलेले विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होणार की अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) गट सत्तेत आल्याने सत्ताधारी वरचढ ठरणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने अडचणीत आलेला शेतकरी, महागाई यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
काँग्रेस दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेते पदावर दावा करणार?
अजित पवार सत्तेत सामिल झाल्यानंतर बदललेल्या समीकरणानुसार कॉग्रेस विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसकडून दावा केला जाणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट सांगितलं आहे. तर, दुसरीकडे विधान परिषद आमदार डॉ. निलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे शिवसेनेत गेल्यामुळे ठाकरे गटाकडे असलेले विधान परिषद विरोधी पक्षनेते पद सुद्धा जाण्याची शक्यता आहे. या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस दावा करण्याची शक्यता आहे. सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार भाजप 22, काँग्रेस 9, ठाकरे गट 8, राष्ट्रवादी (पवार गट) 4, राष्ट्रवादी (अजितदादा गट) 5, शिवसेना 3, इतर 6 आणि 21 पद रिक्त आहेत.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
