(Source: ECI/ABP News/ABP Majha)
School Fee Issue :खासगी शाळांच्या शुल्कात 15टक्के सवलत देण्याचा निर्णय 6दिवसांनंतरही अमंलबजावणी नाही
खासगी शाळांच्या शुल्कात १५ टक्के कपात करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार, असा सवाल उपस्थित होतोय. कारण फी कपातीच्या घोषणेला ६ दिवस उलटल्यानंतरही शाळेच्या फी कपातीचे तपशील जाहीर झालेला नाहीत. त्यामुळे शाळा व्यवस्थापन, पालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. तरी, शाळेची फी तात्काळ भरण्यासाठी शाळा दबाव टाकत असल्याचा आरोप अनेक पालकांनी केलाय. औरंगाबादेत शिक्षणाधिकाऱ्यांकडे ५२ तक्रारी करण्यात आल्यात. त्यामुळे शाळेची फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकण्य़ाची धमकी शाळेनं दिलीय. तर, शाळेतून दाखला हवा असेल तर आधी चालू वर्षाची फी पूर्ण भरण्याची सक्ती केली जातेय. आधीच काही शाळांनी २० ते २५ टक्के फी वाढ केल्याचा आरोपही शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाचे सचिव मिलिंद वाघ यांनी केलीय. तर, राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात मेस्टा संघटना न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.