(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Laxman Hake - Manoj Jarange : मारामाऱ्या कोण लावतं हे जनतेला कळतं - मनोज जरांगे
Laxman Hake - Manoj Jarange : मारामाऱ्या कोण लावतं हे जनतेला कळतं - मनोज जरांगे
हेही वाचा :
पुण्यातील कोंढवा परिसरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मद्यप्राशन करुन मराठा आंदोलकांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर मी मद्यप्राशन केलं की नाही पोलीस बघून घेतील. मात्र मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. यानंतर लक्ष्मण हाके यांची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात आली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांची ससुन रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केली असता प्राथमिक अहवालात त्यांनी मद्यप्राशन केलं नव्हतं, असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला. त्यानंतर आणखी खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी वैद्यकिय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेत. त्यांचा अहवाल येण्यासाठी आणखी एक दोन दिवस लागू शकतात, अशी माहिती समोर आली आहे. हाकेंच्या तक्रारीवरून 20 ते 25 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल- ससून रुग्णालयाकडून लक्ष्मण हाके यांना क्लीनचिट मिळाली. तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांच्या तक्रारीवरून 20 ते 25 मराठा आंदोलकांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. आता लक्ष्मण हाके हे नागपुरला एका कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी सुरू आहे, या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध सुरू केला आहे. यामुळे ओबीसी नेते आणि मराठा आंदोलक आमने-सामने आल्याचे दिसत आहे.