Konkan Temple Fight : कोकणात मानपानावरून थेट देवाच्या गाभाऱ्यातच राडा!
कोकणात गणेशोत्सवातील मानपान हि बाब काही नवीन नाही. दरम्यान, याच मानपानाच्या गोष्टीवरून थेट देवाच्या गाभाऱ्यातच राडा झाला असून दोन गट एकमेकांना भिडले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील डोंगर गावात झालेल्या राड्यानंतर गावात 144 कलम लागू करण्यात आला आहे. तसेच परस्पर विरोधी झालेल्या तक्रारीनंतर दोन्ही बाजुच्या 41 जणांविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंगर गावात शेलार आणि गुरव असे दोन मानकरी आहेत. दरम्यान, होळीच्या दुसऱ्या दिवशी पालखी कुणाकडे पहिल्यांदा नेण्यात यावी यावरून राडा झाला आणि दोन्ही बाजुच्या महिला आणि पुरूष एकमेकांना भिडले. दरम्यान, यावेळी पोलिस उपस्थित असल्यानं त्यांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे संभाव्य मोठा वाद सुदैवानं टळला.

















